Ad will apear here
Next
त्रैभाषिक मुशायऱ्याने जिंकली मने
पुणे : कधी रोजचे जगणे अवघड करणाऱ्या महागाईवर गंमतीशीर टिप्पणी, तर कधी प्रेमाचा गुलकंद आठवत त्रैभाषिक मुशायराने रसिकांची मने जिंकली. निमित्त होते ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह आणि कोजागिरी पौर्णिमेचे.

प्रदीप निफाडकर, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी नझीर फतेहपुरी, जिया बागपती, सुमित पॉल, भाग्यश्री कुलकर्णी यांनी उर्दू, मराठी, हिंदीतून एकामागोमाग सुरेख गझला सादर केल्या.

‘कवी म्हणजे बोलका कवी, रसिक म्हणजे मुका कवी’, असे सांगून निफाडकर यांनी उपस्थितांना विश्वासात घेतले. ‘हा चंद्र , हे चांदणे, घेऊन जा तुमच्या घरी, मुक्काम करते माझ्या घरी, रोज कोजागिरी’ असा कवीचा आत्मविश्वास ही त्यांनी दाखवला.

डॉ. कुमार सप्तर्षी समोर पाहून ‘हे उन्हाने वाळलेले पान आहे, वृध्द नाही, अनुभवाचे रान आहे’ या निफाडकरांच्या ओळी दाद घेऊन गेल्या. ‘दाढी के बाल अब पकने लगे है, हमे वो चाचा जान कहने लगे है’ अशी व्यथा सुमीत पॉल यांनी व्यक्त केली.

प्रचलित परिस्थितीवर भाष्य करत जिया बागपतींनी शेर ऐकवला. ते म्हणाले, ‘कद किसी का रहे चाहे गगन से उंचा, कोई हो सकता नही, अपने वतन से उंचा’. ‘उर्दू और हिंदी में फर्क है इतना, वो देखते है ख्वाब, हम देखते है सपना’ असे म्हणत भाग्यश्री कुलकर्णी यांनी या त्रैभाषिक मुशायरामध्ये उर्दू, हिंदी कवीतील फरक सांगितला.

नझीर फतेहपुरी यांनी अध्यक्षस्थानावरुन बहारदार गझला, दोहे ऐकवले. द्वेष नको प्रेम हवे, सांगताना ते म्हणाले, ‘फुल को हार की जरूरत है, यार को यार की जरूरत है, नफरतों को हवा न दो भाई, देश को प्यार की जरूरत है’.

संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन उपस्थित होते. मैफलीनंतर सर्वांनी मसाला दुधाचा आस्वाद घेतला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZYABH
Similar Posts
‘नेहरू विचार जागविण्याची गरज’ पुणे : ‘भारतीय स्वातंत्र्य लढा हा मानवमुक्ती चळवळीतील एक भाग आहे, असे सांगणारे पंडित नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केले. नेहरूंविषयी काश्मीर-फाळणी, चीनसंदर्भात केली जाणारी टीका कुजबूज तथ्यहीन आहे. आजच्या संदर्भात ‘नेहरू विचार’ पुन्हा जागविण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पंडित नेहरूंचे अभ्यासक अॅड
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त कार्यशाळा पुणे : ‘शांततामय सहअस्तित्व हेच सर्व धर्मांची शिकवण असल्याने धर्माचे मूळ स्वरूप सत्य जाणणे, तसेच लोकशाहीवादी मार्गावर चालण्यानेच दहशतवादाचा धोका कमी होऊ शकतो,’ असा सूर ‘आंतरराष्ट्रीय राजकारण आणि दहशतवादाचे स्वरूप’ या कार्यशाळेत उमटला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी
‘गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त परिसंवाद पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहादरम्यान ‘शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन कधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात शेतकऱ्यांच्या व्यथांवर विचारमंथन करण्यात आले.
‘लघुपट निर्मितीपूर्वी माध्यम कळणे महत्त्वाचे’ पुणे : ‘लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येण्यापूर्वी माध्यम कळणे  महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले. गांधी सप्ताहानिमित्त नवमहाराष्ट्र युवा अभियान, प्रयोग (मालाड) आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लघुपट निर्मिती’ या विषयावर गांधी भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language